गोविंदाच्या सुपरहिट गाण्यावर थिरकणार कार्तिक, भूमी आणि अनन्या


कार्तिक आर्यन आजकाल आपल्या ‘पती, पत्नी आणि वो’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे दिसतील. कार्तिकची चिंटू त्यागीची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या रिलीजपूर्वी चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण झाले आहे. दरम्यान या चित्रपटाची स्टारकास्ट पुन्हा एकदा चित्रपटाच्या एका नव्या गाण्याच्या निमित्ताने एकत्र येणार आहे. ‘पती पत्नी और वो’ चित्रपटात गोविंदा आणि रवीना टंडन यांच्या ‘दुल्हे राजा’ या चित्रपटातील ‘अंखियो से गोली मारे’ या गाण्याचे रिक्रियेटड व्हर्जन पाहायला मिळणार आहे.

फराह खान अंखियो से गोली मारे या रिक्रेएटड व्हर्जनचे नृत्यदिग्दर्शन करणार आहे. फराह खान चित्रपटाचा एक भाग बनल्याबद्दल दिग्दर्शक मुदस्सर अझीझ उत्सुक आहे. याबद्दल आनंद व्यक्त करताना ते म्हणाले, ‘फराह खान हे गाणे कोरिओग्राफ करणार आहे. ती आमच्या चित्रपटाचा भाग असल्याचा मला आनंद झाला कारण तिने सहाय्यक दिग्दर्शक ते लेखक आणि आता दिग्दर्शक असा माझा प्रवास बारकाईने पाहिला आहे.

विशेष म्हणजे हा चित्रपट 1978 साली आयबीआर चोप्रा चित्रपटाच्या ‘पती पत्नी और वो’ चा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये संजीव कुमार यांच्यासह विद्या सिन्हा आणि रंजीता मुख्य भूमिकेत होत्या. त्याचबरोबर या चित्रपटात कार्तिक एक आदर्शवादी नवरा चिंटू त्यागीची भूमिका साकारत आहे, ज्याची पत्नी वेदिका अर्थात भूमी पेडणेकर साकारणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात अनन्या पती-पत्नीमधील तिसरी महिला म्हणून दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment