Video : हा आहे गरिबांचा ‘आयर्न मॅन’, नेटकऱ्यांनी दिल्या विचित्र प्रतिक्रिया

मार्वल स्टुडिओचा फ्रेंचाइजी चित्रपट ‘अॅव्हेंजर्स’चे जर तुम्ही चाहते असाल तर तुम्हाला टोनी स्टार्क अर्थात आयर्न मॅन देखील नक्कीच आवडत असेल. आयर्न मॅनचा सूटल तुम्हाला नक्कीच आठवत असेल. सध्या एक भारतीय व्यक्तीने जुगाड करत आयर्न मॅनशी साम्य असणारा सूट तयार केला आहे. सोशल मीडियावर या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत असून, यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती धातूपासून बनलेल्या हिरव्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. त्याने आपल्या सूटमध्ये अनेक हत्यार देखील बसवलेले आहेत. त्याद्वारे बटन दाबताच त्यातून गोळ्या बाहेर येत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना लिहिण्यात आले आहे की, दहशतवादाशी लढण्यासाठी हा सूट फायदेशीर ठरेल.

या सूट आयर्न मॅन या कॅरेक्टरपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेला आहे. या सूट परिपुर्ण नाही.

असे असले तरी अनेक युजर्स या व्यक्तीच्या प्रयत्नांचे कौतूक करत आहेत. तर काही युजर्स या व्यक्तीची खिल्ली उडवत आहेत.

 

Leave a Comment