‘हा’ बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे दिशा पटनी ट्रोल


बॉलिवूडमध्ये ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाद्वारे पदार्पण करणारी अभिनेत्री दिशा पटनी बहुतेक जणांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. दिशा सोशल मीडियावर देखील खुप सक्रिय असते. याचदरम्यान ती तिचे फोटो शेअर करत असते. कोणताही फोटो किंवा व्हिडीओ दिशाने शेअर केला की त्यावर चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडत असतो. पण यावेळी तिने शेअर केलेल्या फोटोमुळे तिला नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली असून ती सध्या ट्रोल होत आहे. एक बोल्ड फोटो दिशाने शेअर केला असून अनेकांनी त्यावर तिला खडेबोल सुनावले आहेत.


Calvin Klein या ब्रॅण्डची दिशा अॅम्बेसिडर असून काही दिवसापूर्वी तिने या ब्रॅण्डसाठी एक फोटोशूट केले. तिने या फोटोशूटचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. पण ती प्रचंड बोल्ड या फोटोमध्ये दिसत असत असल्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. एका नेटकऱ्याने बाकी सगळे ठीक आहे दिशा, परंतु हा फोटो फारच विचित्र असल्याचे म्हटले आहे. तर एका युजरने दिशा मी तुझी फार मोठी चाहती आहे, पण अशा प्रकारचा फोटो? असे म्हटले आहे.

View this post on Instagram

🌹🍎 #MYCALVINS #CK50 @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on


एका नेटकऱ्याने दिशा तुला लाज वाटली पाहिजे, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे. तर एका नेटकऱ्याने तिची खिल्ली उडवत, अरेरे, दिवाळी आहे आणि तू हे काय कपडे घातले आहेस? असे म्हटले आहे. दरम्यान, दिशाच्या या फोटोला लाखोंच्या संख्येने लाइक्स आले आहेत. हा फोटो काही नेटकऱ्यांना आवडला आहे. तर काहींनी मात्र प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Comment