Video : वैज्ञानिकांनी तयार केला खास माळी रोबोट, असे करतो काम

ब्रिटिश वैज्ञानिकांनी एक असा रोबॉट तयार केला आहे जो स्वतः बागेतील फूल आणि झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम करतो. यासाठी तो स्वतः रस्ता शोधतो व आपले कार्य पुर्ण करतो. वैज्ञानिकांनी याला ‘ट्रिमबॉट’ असे नाव दिले आहे. या रोबॉटमध्ये मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. यामुळे रोबॉट आजुबाजूचे दिशा लक्षात ठेवतो व योग्य दिशेने पुढे जातो. यामध्ये अनेक प्रकारच्या सेंसर आणि कटिंगटूलचा वापर करण्यात आला असून, त्याच्या मदतीने रोबोट झाडांची ट्रिमिंग करतो.

वैज्ञानिकांनुसार, रोबॉटमध्ये कॉम्प्युटर व्हिजनचा वापर करण्यात आला आहे. यामुळे कमी प्रकाशात आणि खराब वातावरणात देखील हा रोबॉट बागेपर्यंत जाऊन स्वतःचे कार्य पुर्ण करतो.

https://youtu.be/OTbvDKV2vFs

ट्रिमबॉटमध्ये पाच कॅमेऱ्यांसोबत फ्लेक्सिबल आर्म लावण्यात आली आहे. याच्या मदतीने रोबॉट कमी जागेत सहज हालचाल करू शकतो आणि झाडांवरील फूल तोडणे, ट्रिमिंगचे काम करतो. हा ट्रिमबॉट इलेक्ट्रिक कंपनी बॉशने तयार केला आहे.

इंफोर्मेटिक्स एक्सपर्ट बॉब फिशरनुसार, ट्रिमबॉटमधील कोडेड अल्गोरिद्म त्याला झाडांचा आकार कोठे अधिक वाढला आहे ? कोठे ट्रिमिंग केले पाहिजे ? फुल कसे व केवढे तोडायचे ? हे सर्व सांगते.

रोबोट तयार करणाऱ्या एडिनबर्ग युनिवर्सिटीच्या टीमनुसार, हा रोबोट शेतकऱ्यांना देखील मदत करेल. याशिवाय ज्यांना चालता-फिरता येत नाही अशांच्या बागेची काळजी घेण्यासाठी देखील हा ट्रिमबॉट फायदेशीर आहे.

 

Leave a Comment