बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री विवाहित पुरुषांशी लग्न करुनही ठरल्या यशस्वी


लग्न, रिलेशनशिप आणि त्यानंतर ब्रेकअप घटस्फोट या गोष्टी बॉलिवूडमध्ये अगदी सामान्य झाल्या आहेत. पण अशा काही अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये आहेत ज्यांनी विवाहित पुरुषांशी लग्न केले आणि या अभिनेत्रींचे हे पहिलेच लग्न होते.

2012 साली अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान विवाहबद्ध झाले आणि आता त्यांना तैमुर नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. पण सैफची करिना दुसरी पत्नी आहे. सैफने अमृता सिंहसोबत 1991मध्ये याआधी लग्न केलं होते पण त्यांनी 2004मध्ये घटस्फोट घेतला. सैफला पहिल्या पत्नीपासून सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत.

1979 मध्ये अभिनेत्री हेमा मालिनीशी अभिनेते धर्मेंद्र यांनी लग्न केले. पण त्यांचे लग्न त्याआधी प्रकाश कौर यांच्याशी लग्न झाले होते. इशा आणि अहाना अशा दोन मुली धर्मेंद्र आणि हेमा यांना आहेत.

बोनी कपूर यांच्या अभिनेत्री श्रीदेवी दुसऱ्या पत्नी होत्या. मोना कपूर असे बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव असून अंशुला आणि अर्जुन अशी त्यांना दोन मुलं आहेत. तर श्रीदेवी आणि बोनी यांना जान्हवी आणि खूशी या दोन मुली आहेत.

2009 साली प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्राशी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने लग्न केले असून विहान हा या दोघांना एक मुलगा सुद्धा आहे. फार कमी लोकांना माहित आहे की शिल्पा ही राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे. कविता असे राजच्या पहिल्या पत्नीचे नाव असून त्याला तिच्यापासून देलिना ही 12 वर्षांची मुलगी आहे.

सध्या बॉलिवूडमधील यशस्वी जोडी म्हणून अभिनेता आमिर खान आणि किरण राव ही जोडी ओळखली आहे. पण किरण ही आमिरची दुसरी पत्नी आहे. आमिरने याआधी रिना दत्ताशी लग्न केले होते. असे असून सुद्धा किरण आणि रिना एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत.

Leave a Comment