मुंबई : यावेळीसुद्धा विधानसभेमध्ये ‘पाटीलकी’ पाहायला मिळणार असून विधानसभेवर एक-दोघं नव्हे, तर ‘पाटील’ आडनाव असलेले तब्बल 26 आमदार निवडून आले आहेत. विधानसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे आणि बहुजन विकास आघाडी अशा सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे ‘पाटील’ आवाज उठवणार आहेत.
यंदाच्या विधानसभेतच ‘पाटीलकी’चा बोलबाला !
23 पाटलांचा 13 व्या विधानसभेमध्ये समावेश होता. यावेळी संख्येत तीनने वाढ झाली असून पाटील या आडनावाचा शहरी भागात नसला, तरी ग्रामीण भागात दबदबा आहे. त्यातच मूळ आडनावापुढे पाटील लावणाऱ्यांची संख्याही कमी नाही. राष्ट्रवादीच्या तिकीटावर विधानसभेतील सर्वाधिक पाटील हे निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादीकडून सात पाटील आमदार झाले आहेत. त्यापाठोपाठ शिवसेनेचे सहा, भाजपचे पाच, काँग्रेसचे चार, तर मनसे आणि बविआचे प्रत्येकी एक पाटील आमदार झाले आहेत. दोघा अपक्ष आमदारांचे आडनावही पाटील आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटील
- दिलीप वळसे पाटील (आंबेगाव)
- जयंत पाटील (इस्लामपूर)
- सुमनताई पाटील (तासगाव)
- अनिल पाटील (अंमळनेर)
- बाबासाहेब पाटील (अहमदपूर)
- बाळासाहेब पाटील (कराड उत्तर)
- राजेश नरसिंग पाटील (चंदगड)
शिवसेनेचे पाटील
- गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण)
- किशोर पाटील (पाचोरा)
- चिमणराव पाटील (एरंडोल)
- राहुल पाटील (परभणी)
- शहाजी बापू पाटील (सांगोला)
- कैलास पाटील (उस्मानाबाद)
भाजपचे पाटील
- चंद्रकांत पाटील (कोथरुड)
- राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी)
- रवीशेठ पाटील (पेण)
- राणा जगजितसिंह पाटील (तुळजापूर)
- संतोष दानवे पाटील (भाजप)
काँग्रेसचे पाटील
- ऋतुराज पाटील (कोल्हापूर दक्षिण)
- कुणाल पाटील (धुळे)
- माधवराव पाटील जवळकर (हदगाव)
- पी एन पाटील सडोलीकर (करवीर)
मनसेचे पाटील
- राजू (प्रमोद) पाटील (कल्याण ग्रामीण)
बविआचे पाटील
- राजेश पाटील (बोईसर)
अपक्ष पाटील
- चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)
- राजेंद्र पाटील यड्रावकर (शिरोळ)