
तोंड नसलेला मासा तुम्ही कधी पाहिला आहे का? पण शास्त्रज्ञांना ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील समुद्र किनाऱ्यावर तोंड नसलेल्या माशाची नवी प्रजाती आढळली असून या माशांना तोंड नसल्याने फेसलेस फिश असे नाव देण्यात आले आहे. खोल समुद्रात आढळलेला या माशाला डोळे नसले तरी तो अंधारात उत्तम पोहू शकतो.
तब्बल १४३ वर्षांनी शास्त्रज्ञांना सापडला दुर्मिळ मासा
हा मासा १८७४ मध्ये आढळला होता, त्यानंतर तब्बल १४३ वर्षांनी हा दुर्मिळ मासा पुन्हा एकदा शास्त्रज्ञांना सापडला. या माशाला डोळे नाहीत, खोल समुद्रात हा मासा आढळल्याने आता सगळ्यांना त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. या माशाचा वावर जिथे सूर्यप्रकाशही पोहोचू शकत नाही तिथे असतो. येथे गोठवून टाकणारे तापमान आणि अन्नाची अत्यंत कमी उपलब्धता अशा बिकट परिस्थितीतही हा मासा जिवंत राहू शकतो. त्याला डोळे नसले तरी समुद्रात तो इतका सहज कसा पोहू शकतो याचा शोध आता शास्त्रज्ञ घेत आहेत.
