माझ्या बकरीचा समद्यास्नी लागलय लळा…


आसाममध्ये एका बकरीचा सर्वांना लळा लागला असून या बकरीला पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे कारण आपण आजवर दोन डोके असलेले प्राणी जन्माला आल्याचे तुम्ही पाहिले किंवा ऐकले असेलच. पण चक्क एक डोळा असणारी बकरी आसाममध्ये जन्माला आली आहे. या बकरीने मुखरी दास यांच्या घरात जन्म घेतला आहे. या बकरीला एक डोळा असला तरीही ते इतर बकरीप्रमाणे हिंडू फिरू शकते. एका डोळ्याच्या बकरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

गावकरी या एक डोळ्याच्या पिल्लाला पाहण्यासाठी मुखरी दास यांच्या घरी तुफान गर्दी करत आहेत. बकरीला एक डोळा असला तरीही ते इतर बकरीप्रमाणे हिंडू फिरू शकत आहे. तसेच या बकरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा चमत्कार पाहण्यासाठी गावक-यांसोबतच इतरही नागरिक गर्दी करत आहेत.

Leave a Comment