जाणून घ्या बिस्किटांवरील छिद्र असण्याचे कारण


मुंबई – बिस्किट हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण खातात. काहीजण केवळ बिस्किट खातात तर काहीजणांना चहामध्ये बिस्किट घालून खायला आवडते. वेळ बदलली तशी बिस्किटांची चव बदलत गेली आहे पण चहामध्ये बिस्किट बुडवून खाण्याची पद्धत आजही लोकांमध्ये पहायला मिळते. सकाळी चहासोबत भारतातील बहुतांश लोक हे बिस्किट खाणे पसंद करतात.

१४ व्या शतकापासून लोक बिस्किट खात आहेत. पण याच बिस्किटांवर छिद्र का असतात हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? याचा कधी विचार तुम्हीही केला नसेल. पण काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, बिस्किटांवर बारीक छिद्र (होल) नेमके कशासाठी असतात.

बिस्किटांवर छिद्र का असतात याची माहिती फारच कमी लोकांना आहे. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात काही माहिती सांगणार आहोत. बिस्किटांचा आकार हा थोडा मोठा असतो त्यामुळे ही बिस्किट सामान्यत: भट्टीत किंवा मशीनमध्ये भाजल्यास ते कच्च राहत असल्यामुळेच त्याच्यावर छिद्र करण्यात येतात ज्यामुळे बिस्किटांवर एक डिझाइनही तयार होते.

भट्टीत किंवा मशीनमध्ये छिद्र असलेले बिस्किट टाकल्यानंतर ते पूर्णपणे फुलतात आणि चांगल्याप्रकारे भाजले जातात. ही बिस्किट चांगल्याप्रकारे भाजल्यानंतर ते भट्टीतून बाहेर काढले जातात आणि मग त्याची पॅकिंग केले जाते. जर बिस्किटांवर छिद्र केली नाहीत तर बिस्किट भाजताना ती कच्चीच राहतात आणि त्यामुळे बिस्किटांची मजाच निघून जाते. सर्वच बिस्किटांवर छिद्र असतात असे नाही तर, काही बिस्किटांवरच छिद्र असतात.

Leave a Comment