लग्नास नकार देणाऱ्या प्रियकरावर प्रेयसीने फेकले अॅसिड


अलिगड – उत्तर प्रदेशमधील अलीगड जिल्ह्यात प्रियकरने लग्न करण्यास नकार दिल्यामुळे प्रेयसीने त्याच्यावर अ‍ॅसिड फेकले आहे. पीडित मुलाला रुग्णालयात दाखल केले आहे. अॅसिडमुळे त्याच्या डोळ्यावर गंभीर परिणाम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या युवकावर उपचार सुरू असून आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित मुलाच्या आईने सांगितले की आपला मुलगा आरोपी महिलेशी संबंधात होता. परंतु महिन्याभरापूर्वीच त्या मुलीशी बोलणे थांबवले होते. तिने दावा केला की त्यानंतर मुलीने फोन करून लग्नासाठी सतत त्याच्यावर दबाव आणला. पीडित मुलाच्या आईने सांगितले की, आरोपी मुलीने गुरुवारी मुलाला बोलावून घेतले. त्याने फोनला उत्तर दिले नाही. याचा राग येऊन महिलेने आपल्या घराशेजारील दुकानात उभे असताना त्याच्यावर अ‍ॅसिड फेकले.

त्याचवेळी आरोपी महिलेने पीडि युवकावर गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने पोलिसांना सांगितले की तिचा प्रियकर तिला अशी धमकी देत असे की तिने लग्न करण्यास नकार दिल्यास तो तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल. या महिलेविरोधात भादंवि कलम 6२6 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी या युवकाला जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment