Video : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान दिवाळीबद्दल हिंदीमध्ये काय म्हणाले बघाच

भारतभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. भारताबरोबरच इतर देशांमध्ये देखील दिवाळीचा सण आनंदाने साजरा केला जातो. आता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारतीयांना खास हिंदीमध्ये ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मॉरिसन यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत की, नमस्ते, किती चांगला आहे हा दिवाळीचा सण. मला दिवाळीचा सण खूप आवडतो. कारण हा सण आपल्या मान्यता आणि विश्वासाशी जोडलेला आहे.

मॉरिसन यांनी हिंदीमध्ये दिलेल्या या शुभेच्छांमुळे भारतीय नागरिक त्यांचे कौतूक करत आहेत. मॉरिसन यांनी यावर्षीच मे महिन्यात निवडणुकीत विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे.

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीयांना देखील मॉरिसन यांनी शुभेच्छा देत आनंदाने दिवाळी साजरा करण्यास सांगितले. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन त्यांच्या संघासाठी चक्क ‘वॉटर बॉय’ बनल्यामुळे देखील सध्या चर्चेत आहेत.

Leave a Comment