या तीन हुतात्म्यांना भारतरत्न देण्याची काँग्रेस नेत्याने केली मागणी

काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी स्वातंत्र्य सैनिक भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न द्यावा अशी मागणी केली आहे. मनिष तिवारी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

आपल्या पत्रात तिवारी यांनी म्हटले आहे की, भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव या यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. तिघांनी ब्रिटिश साम्राज्याविरोधात लढताना देशवासियांना आंदोलनासाठी प्रेरणा दिली. यानंतर 23 मार्च 1931 ला त्यांनी देशासाठी बलिदान दिले.

जर 2020 च्या प्रजासत्ताक दिनी सन्मानित करण्यात आले तर त्यांना शहीद – ए – आझम या किताबाने सन्मानित केल्यासारखे असेल. याशिवाय मोहाली येथील विमानतळाचे नामकरण देखील शहीद-ए-आजम भगत सिंग एअरपोर्ट असे करण्यात यावे.

याआधी एमआयएमच्या अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील या तीन हुतात्म्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. तसेच भाजपने वीर सावरकरांना भारतरत्न देऊ असे आपल्या 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात म्हटले होते.

Leave a Comment