जाणून घ्या ‘गाव तिथे बिअर शॉप’ म्हणत प्रचार करणाऱ्या उमेदवाराला मिळाली किती मते


चंद्रपुर – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले असून यंदाच्या निवडणुकीत प्रचाराचे विविध मुद्दे आले, प्रचार सभा आल्या. पण, चंद्रपूर येथील एका महिला उमेदवाराची प्रचाराची अनोखी स्टाईल या निवडणुकीत विशेष ठरली होती.

दारुला चंद्रपूर मधील चिमूर येथील एका महिला उमेदवाराने उघड समर्थन दिले होते. आपल्या जाहीरनाम्यातून चिमूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी दारुला समर्थन दिले. त्यांनी ‘गाव तिथे बिअर बार’ अशी घोषणा देत आपल्या प्रचाराचा बार उडवला होता.

ज्या जिल्ह्यात दारुबंदी आहे, त्याच जिल्ह्यात दारुला या उमेदवाराने उघड समर्थन दिले होते. चिमूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी थेट जाहीरनामा प्रकाशित करत दारुला समर्थन दिले. त्यांनी ‘गाव तिथे बिअर बार’ अशी घोषणा देत प्रचाराचा बार उडवला होता.

आपल्या जाहीरनाम्यात नमूद केल्यानुसार बेरोजगार तरुणांना दारु विक्रीचे परवाने, गाव तिथे बिअर बार, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सवलतीत दारु देणे अशी अनेक आश्वासने वनिता यांनी जनतेला दिली होती. त्यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओदेखील महाराष्ट्रभर सोशल मीडियाद्वारे तुफान फिरत होता. मात्र प्रत्यक्ष मतदानात जनतेने त्यांची साथ सोडली. वनिता यांना फक्त 286 मिळाली मते आहेत. तर त्या मतदारसांघातून विजयी झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला 86,852 मते मिळाली आहेत.

Leave a Comment