जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जेफ बेझॉस यांची घसरण


सिएटल – जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस यांची घसरण झाली असल्यामुळे पुन्हा एकदा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स या स्थानावर जाऊन बसले आहेत. अॅमेझॉनचे तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाले असून, जेफ बेझॉस यांचे शेअर्समधील उत्पन्नात ७ अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचे त्यामध्ये म्हटले आहे.

अॅमेझॉनच्या शेअर्समध्ये गुरुवारी दुपारच्या सत्रामध्ये ७ टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसले. यामुळे जेफ बेझॉस यांची संपत्ती १०३.९ अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे. त्याचवेळी बिल गेट्स यांची संपत्ती १०५.७ अब्ज डॉलर एवढी आहे. २४ वर्षांपासून जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती या स्थानावर असलेले बिल गेट्स गेल्यावर्षी पहिल्यांदा एक स्थान खाली उतरले होते. त्यावेळी जेफ बेझॉस या स्थानावर पोहोचले होते. पण यावेळी पुन्हा एकदा जेफ बेझॉस खाली उतरले. अॅमेझॉनच्या निव्वळ उत्पन्नात तिसऱ्या तिमाहीमध्ये २६ टक्क्यांची घट झाली. २०१७ नंतर पहिल्यांदाच अॅमेझॉनच्या नफ्यात घट झाल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे.

Leave a Comment