परळीत गुलाल धनंजय मुंडेंचाच, पंकजा मुंडेंचा पराभव


बीड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बिग फाईट म्हणून बीड जिल्ह्यातील परळीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मोठ्या प्रमाणावर भावनिक झालेल्या परळीच्या रणांगणात अखेर धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केला आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांनी मतदारांनी दिलेला कौल मान्य असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी हा निकाल अनाकलनीय असल्याचे देखील म्हटले आहे. तसेच कार्यकर्त्यांनी शांत राहावे असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी केले आहे.

भाजपसाठी हा मोठा धक्का असून परळी हा विद्यमान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु, धनंजय मुंडेंनी विजय मिळवत देत पंकजा मुंडेंना जोरदार धक्का दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आणि दसरा मेळाव्यानिमित्त झालेली गृहमंत्री अमित शहा यांची प्रचारसभा यांचाही विशेष परिणाम मतदारांवर झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. धनंजय मुंडे यांचा हा विजय जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करणारा आहे.

Leave a Comment