विराट कोहलीने केली ही ऑडी लाँच

जर्मनीची लग्झरी कार निर्माता कंपनी ऑडीने भारतात आपली नवीन सेडान कार ए6 लाँच केली आहे. या लाँचिंग वेळी भारतीय क्रिकेट संघाच कर्णधार विराट कोहली देखील उपस्थित होता.

या खास कारच्या किंमतीबद्दल सांगायचे तर याची एक्स शो रूम किंमत 54.20 लाख रूपये आहे.

(Source)

 

नवीन जनरेशन ऑडी A6 च्या बाहेरील लूकमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये पॅरोनॉमिक सनरूफ, डायनामिक टर्न इंडीकेटर्स, एलईडी टेललाइट्स, नवीन हेडलाइट्स, क्रॉम पॅकेज आणि इंटीग्रेटिड बूट लिड स्पॉयलरसारखे फीचर्स मिळतात. याशिवाय इंटेरियरबद्दल सांगायचे तर याच्या डॅशबोर्डवर अनेक नवीन गोष्टी पाहयला मिळतात. यात सन पॉजिशन सेंसर सोबत 4 झोन एअर कंडीशनिंग, डोर शोलडर्स, गेस्चर बेस्ड ट्रंक लिड ऑपनिंग सारखे फीचर्स आहेत.

(Source)

परफॉर्मेंससाठी नवीन ऑडी ए6 मध्ये 2.0 लीटरचे बीएस-6, TFSI इंजिन आहे, जे 180kW ची पॉवर आणि 142 Nm चा टॉर्क जनरेट करते. यात 7 स्पीड एस-ट्रॉनिक गिअरबॉक्सचा समावेश आहे. ही कार 1 लीटर फ्यूलमध्ये 14.11 किमीचे मायलेज देते. केवळ 6.8 सेंकदात ही कार ताशी 100 किमीचा वेग पकडू शकते. एकूणच ऑडी A6 चे हे नवीन मॉडेल आधीच्या मॉडेल पेक्षा अधिक शानदार आहे.

Leave a Comment