शेकापच्या गडाला शिवसेनेच्या वाघाने लावला सुरंग


सोलापूर: अनेक दिग्गज नेत्यांना विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यातच आता एक मोठा झटका शेतकरी कामगार पक्षाला सुद्दा बसला आहे. कारण, गेल्या ५५ वर्षांपासून असलेला गड शेकापला गमावला आहे. शेकाप उमेदवार डॉ अनिकेत देशमुख यांचा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. तर शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांचा या मतदारसंघात विजय झाला आहे.

गेल्या ५५ वर्षांपासून सांगोला मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. या मतदारसंघाचे नेत्रृत्व आमदार गणपतराव देशमुख हे करत होते. पण, त्यांनी यंदा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाऊसाहेब रूपनर यांना शेकापकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण, नंतर शेकाप कार्यकर्त्यांच्या मागणीवरुन गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ अनिकेत चंद्रकांत देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली.

मतदारांनी या निवडणुकीत गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना नाकारले असून शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांनी विजय मिळवला आहे. अनिकेत देशमुख यांच्या पराभवामुळे शेतकरी कामगार पक्षाला एक मोठा झटका बसला आहे.

Leave a Comment