स्केटिंग खेळाडू कीगन मेसिंगने अशी जागविली भावाची आठवण


कॅनडाचा स्केटिंग खेळाडू कीगन मेसिंग याने अमेरिकी स्टेट टुर्नामेंटमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षकांना टाळ्यांचा गजर करण्यास भाग पाडले आणि पाहतापहाता स्टेडियममध्ये भावनेची लहर उचंबळून आली. प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला तो कीगनच्या खेळासाठी नाही तर अगदी दुखद परिस्थितीचा सामना करूनही केगनने अमेरिकी टूर्नामेंटमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल.

झाले असे की केगनचा छोटा भाऊ पेक्सन महिन्यापूर्वी एका अपघातात मरण पावला. मात्र इतका जबर धक्का बसूनही केगनने त्याची तयारी थांबविली नाही. इव्हेंट रिंग मध्ये त्याने भावाचा फोटो ठेऊन स्केटिंग केले त्यावेळी प्रेक्षकात त्याचे आईवडील, पत्नी व जवळचे मित्र उपस्थित होते. केगन म्हणाला गेले काही आठवडे मी मानसिक तयारी करत होतो आणि त्यात यशस्वी झालो हा आनंद मोठा आहे. या स्पर्धेत केगन चौथ्या स्थानावर आला.

Leave a Comment