राज्यात भाजप ११० जागांवर आघाडीवर


पुणे – विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीचे काम करत आहेत. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे. दरम्यान साताऱ्यात विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल एकत्र येणार असल्याने त्या निकालासाठी काहीसा विलंब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे हे ६ हजार ५०० मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर विद्यमान आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे आव्हान आहे. या मतदारसंघातील निवडणूक फार गाजली होती. त्याचबरोबर सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले हे ३२ हजार मतांनी पिछाडीवर असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांनी कडवी झुंज दिली आहे.

मनसेचे कल्याण ग्रामीणमधील उमेदवार राजू पाटील यांनी तिसऱ्या फेरी अखेरीस तब्बल ३ हजार २७७ मतांची आघाडी घेतली आहे. मनसेच्या राजू पाटील यांना १९ हजार ६२९ तर शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांना १६ हजार ३५२ मते मिळाली आहेत. शिवसेनेचे विद्यमान मंत्री विजय शिवतारे पुरंदरमधून तब्बल ४ हजार मतांनी पिछाडीवर गेले आहेत.

ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे गणेश नाईक हे १० हजार ४७२ मतांनी आघाडीवर आहेत. चौथ्या फेरी अखेरीस नाईक यांना १४ हजार ९३१, मनसेच्या निलेश बाणखिले यांना ४ हजार ४५९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेश शिंदे यांना ३ हजार ४२५ मते मिळाली आहेत.सोलापूर शहर मध्यमधून कॉंग्रेस प्रणिती शिंदे या ४ हजार २९१ मतांनी पिछाडीवर आहेत. त्यांना एमआयएमच्या फारूक शाब्दी यांनी कडवी टक्कर दिली आहे. फारूक शाब्दी यांना ९ हजार ५२३ मते मिळाली आहेत. तर शिवसेनेच्या दिलीप माने यांना ३ हजार ४४ मते मिळाली आहेत. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना कसबा विधानसभा मतदारंसघातून मोठी आघाडी मिळाली आहे. दहाव्या फेरीनंतर त्यांना जवळपास १५ हजार ५०० मतांची आघाडी मिळाली आहे.

Leave a Comment