आयटीसीने बनविले जगातील महागडे चॉकलेट


भारतीय कंपनी आयटीसीने मंगळवारी जगातील सर्वात महाग चॉकलेट लाँच केले आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वाधिक महाग चॉकलेटची नोंद झाली. या चॉकलेटची किंमत ४.३ लाख रुपये किलो आहे. कंपनीच्या लग्झरी ब्रांड फॅबलच्या रेंजमध्ये ट्रिनिटी ट्रफल एक्स्ट्राऑर्डीनेटर नावाने हे चॉकलेट लाँच केले गेले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी(फूड डिव्हिजन) अनुज रुस्तगी म्हणाले १५ ट्रफल कॅन्डीचा बॉक्स १ लाख रुपये किमतीचा आहे. प्रत्येक कॅन्डीचे वजन १५ ग्राम आहे. म्हणजे एका कॅन्डीची किंमत ६६६७ रुपये आहे.


हे चॉकलेट हाताने बनविलेल्या लाकडी बॉक्स मधून मिळणार आहे. या चॉकलेटमुळे कंपनीने लग्झरी चॉकलेट मार्केटमध्ये केवळ देशातच नाही तर जगात बेंचमार्क स्थापित केला आहे. या चॉकलेटची नोंद गिनीज बुकने घेतली आहे. फ्रांसचा सुप्रसिद्ध शेफ फिलीप कॉंटीसोनी व फॅबलचे मास्टर चॉकलेटीअर यांनी एकत्र मिळून हे चॉकलेट बनविले आहे.

हे चॉकलेट तीन व्हेरीयंट मध्ये उपलब्ध आहे. पहिल्यात ताहितीयन व्हॅनीला बिन्सवर टोस्टेड कोकोनट गर्निश केले आहे. दुसऱ्यात घाना डार्क चॉकलेट व जमैकन ब्ल्यू माउंटन कॉफी ब्लेंड आहे तर तिसरा एक्स्ट्रीम वेस्ट स्रोतापासून मिळविलेले सेंट डॉमनिक डार्क चॉकलेट आहे.

Leave a Comment