किती वाजता येणार पहिला निकाल?


मुंबई : सोमवारी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वांना आता निवडणूक निकालाची उत्सुकता लागली आहे. आघाडीला धोबीपछाड देत महाराष्ट्रात पुन्हा युती सत्तेवर येणार की युतीला धक्का देत आघाडी बाजी मारणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

उद्या (गुरुवारी)सकाळी 8 वाजता विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटांत पहिला कल हाती येईल. त्यानंतर कोणत्या पक्षाचा उमेदवार कोणत्या जागेवर आघाडीवर आणि पिछाडीवर कोणता उमेदवार आहे, हे कळण्यास सुरुवात होईल. दुपारी 1 च्या आसपास मतमोजणी सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर मतदारसंघाचा निकाल येण्याची शक्यता आहे.

सर्वच पक्षातील उमेदवारांनी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचे पाहायला मिळाले. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर प्रचाराच्या मैदाना अनेक आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले. त्यानंतर 21 ऑक्टोबर मतदान झाल्यानंतर सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. आता उद्या मतमोजणी असलेल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही धाकधूक वाढल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकले आहे हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल.

Leave a Comment