केवळ 600 Sqft मध्ये बनलेल्या घराला मिळाला ‘बेस्ट इंटेरियर’चा पुरस्कार

वरील फोटो बघून कदाचित तुम्हाला हे छोटे गोडाऊन वाटले असेल. खूपच क्रिएटिव्ह असाल तर एखादे आर्ट स्ट्रक्चर वाटू शकते. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, हे एक घर असून याला ‘बेस्ट इंटेरियर 2019’ हा पुरस्कार मिळाला आहे. हे नेदरलँडमधील एक घर असून, यात गरजेच्या प्रत्येक सुविधा आहेत.

(Source)

प्रत्येक वर्षी आर्किटेक्चर वेबसाइट ‘डीजीन’ जगभरातील सर्वोत्तम इमारतींना पुरस्कार देत असते. क्रिस कोलारिस आणि आय29 यांनी बनवलेल्या हॉलिडे होमला या वर्षीचा सर्वोत्तम इंटेरियरचा पुरस्कार मिळाला आहे. या स्पर्धेत आर्किटेक्चर, इंटेरियर आणि डिझाईन या गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातात. हे घर चार ब्लॉक्समध्ये बनवण्यात आले आहे.

(Source)

हे घर ऐम्स्टर्डेम येथील भागात बनले आहे. अगदी छोट्या जागेत हे घर अगदी व्यवस्थित बनवण्यात आले आहे. हे घर 600 स्केअर फूट पेक्षाही कमी जागेत बनवण्यात आलेले आहे. यामध्ये कंक्रीटचे चार ब्लॉक असून जे चारही एकाच टिकाणी येऊन मिळतात.

(Source)

आय29 फर्मचे डिजायनर्स जेरॉन डेलेंसन आमि जॅस्पर जॅन्सन यांनी सांगितले की, चारही ब्लॉक्सचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करण्यात आला आहे. एक घरात प्रवेश करण्यासाठी, दुसरे किचन आणि डायनिंग स्पेस, तिसरे लिव्हिंग रूम आणि चौथे बेडरूम आहे. यामध्ये बेडरूमची खोली सर्वात मोठी आहे. बेडरूमची खोली दोन मजली आहे.

(Source)

त्यांनी सांगितले की, याची डिझाईन करताना एक साधे व नाविन्यपुर्ण घर बनवण्याचा विचार केला. जेवढ्या अधिक प्रमाणात हे ईको-फ्रेंडली बनवता येईल, याचा आम्ही प्रयत्न केला. रंग देखील पांढरा आणि राखाडी ठेवला आहे.

Leave a Comment