
मागील काही महिन्यांपासून सर्वत्र रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा आहे, हे प्रकरण तसे लपलेले नाही. आलिया याबद्दल स्वत: रणबीर काही बोलत नसला तरी ही गोष्ट ते लपवतही नसल्यामुळे त्यांचे हे नाते आता सिनेसृष्टीमध्ये उघड आहे. पण आता एक नवी जोड याच चर्चांना लागली आहे.

एका पत्रिकेवरुन या लग्नाची कहाणी सुरु झाली, रणबीर आणि आलियाच्या लग्नाची एक पत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. रणबीर आणि आलिया पत्रिकेनुसार पुढच्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये 22 जानेवारीला विवाहबद्ध होणार असून पत्रिकेत लग्नाचे ठिकाण जोधपूरच्या उमेद भवन पॅलेस आहे. पण यामागचे सत्य हे आहे की ही पत्रिका पूर्णपणे खोटी आणि फोटोशॉप केलेली आहे आणि लग्नाबद्दल काहीच माहिती रणबीर आलियाने दिलेली नाही.
व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे रणबीर-आलियाची लग्नपत्रिका
या पत्रिकेत सर्वप्रथम आलियाच्या वडिलांचे नाव मुकेश भट्ट असे लिहिलं आहे आणि आलिया ही मुकेश नाही तर महेश भट्ट यांची मुलगी आहे, मुकेश तिचे काका आहेत. इंग्रजीमध्ये यावर लिहिलेले ALIYA हे स्पेलिंगही चुकीचं आहे. या वेडिंग कार्डची क्वॉलिटी जरी पाहिली तरी हे एक बनावट खोटे वेडिंग कार्ड असल्याचे पत्रिका पाहायल्यानंतर लगेचच कळते. आलियाला यावर प्रश्न विचारला असता हसूनच तिने प्रतिक्रिया दिली, यावर बोलणे तिने टाळले. ही पत्रिका ज्याने बनवली त्याला नक्कीच दोघांच्या लग्नाची उत्सुकता आहे.
