प्रदुषण रोखण्यासाठी आयआयटीच्या विद्यार्थ्याने बनविले खास उपकरण

आयआयटी खडगपूरच्या पदवीधर विद्यार्थ्याने वाहनांद्वारे होणारे प्रदुषण राखण्यासाठी खास  उपकरण बनविले आहे. हे उपकरण वाहनांच्या सायलेंसरजवळ बसवण्यात आले तर वायू प्रदुषण कमी होईल. विद्यार्थ्याने या उपकरणाला ‘पीएम 2.5’ असे नाव दिले आहे. आयआयटी खडगपूरच्या मॅकेनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेल्या देवयान साहाने दावा केला आहे की, हे उपकरण कारमध्ये लावले तर यामुळे आपोआप 10 कारमधून निघणारे प्रदुषण संपेल.

साहाने सांगितले की, या तंत्रामध्ये इलेक्ट्रिक उर्जा आणि तरंग उर्जाचा वापर करून प्रदुषण रोखले जाऊ शकते. हे वातावरणातील अन्य प्रदुषण निर्माण करणाऱ्या कणांना आकर्षित करते. हे एखाद्या चुंबकप्रमाणे कार्य करते. त्यांचा आकार वाढल्यावर हवेत प्रदुषण होण्याऐवजी आपोआप खाली जमिनीवर पडतात.

त्याने सांगितले की, प्रदुषणाच्या समस्येचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आले की, याला जबाबदार पीएम 2.5 (वायू प्रदुषणातील एक घटक) नसून, त्याचा सुक्ष्म आकार आहे. जे आपल्या फुफ्सांमध्ये आणि रक्तामध्ये सहज शिरते. साहाने आपल्या उपकरणाचा उद्यागोसाठी वापर करण्यासाठी अनेक संघटनांशी चर्चा करण्यास सुरूवात केली आहे.

Leave a Comment