ब्रिटिश राजघराण्यात उभी फूट

मागील काही दिवसांपासून ब्रिटिश राजघराण्यात फूट पडल्याचे सांगण्यात येत आहे.  प्रिन्स हॅरी आणि प्रिंस विलियम यांच्या नात्यामध्ये दरी निर्माण झाल्याची अफवा पसरली होती. आता प्रिन्स हॅरीनेच ही अफवा खरी असल्याचे म्हटले आहे. त्यांने स्विकार केला आहे की, त्याच्या आणि भाऊ विलियमच्या नात्यात अंतर निर्माण झाले आहे.

प्रिन्स हॅरीने एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, मागील काही दिवसांपासून त्यांचे कुटुंब दबावात आहे. प्रिन्स हॅरी आपली पत्नी मेगन मार्केलसोबत दक्षिण आफ्रिकेला गेले होते. त्या वेळी प्रिन्स हॅरी म्हणाला होता की, आम्ही दोघे भाऊ होतो आणि नेहमी राहू. आता आमचे रस्ते वेगळे झाले आहेत. असे असले तरी देखील मी नेहमी त्यांच्या बाजूने उभा राहील. कारण त्याने नेहमी मला साथ दिली आहे. सर्वांनाच माहिती आहे की, दोन भावांमध्ये कधी चांगले दिवस असतात तर कधी वाईट दिवस देखील येतात.

प्रिन्स हॅरीची पत्नी मेगन मार्केल आणि प्रिन्स विलियमची पत्नी केट मिडलटन यांच्यामध्ये भांडण झाल्याचे देखील सांगितले जाते. मेगन मार्केलने सांगितले की, मागील एक वर्ष अडचणीचे होते. माझ्या काही मित्रांनी देखील राजघराण्यात लग्न करू नकोस, असे सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, हॅरीबरोबर लग्न करणे हा योग्य निर्णय नाही. मागील वर्षी लग्न झाल्यापासून दबाव सहन करावा लागत आहे.

Leave a Comment