आशिया चषक; ‘या’ दिवशी होणार भारत-पाक हायव्होल्टेज सामना


नवी दिल्ली – आशियाई क्रिकेट असोसिएशनने काही तासांपूर्वी आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले असून भारत-पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. पण, ही स्पर्धा पुरुषांची नसून महिलांची आहे.

भारत व पाकिस्तान यांच्यासह श्रीलंका आणि बांगलादेश या संघांचाही आशियाई क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलेल्या आशिया चषक स्पर्धेत समावेश आहे. दरम्यान, २२ ते २७ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत श्रीलंकेमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.

अशिया करंडकाचे वेळापत्रक –
22 ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश
22 ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
23 ऑक्टोबर – भारत विरुद्ध श्रीलंका
23 ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश
24 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
24 ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
27 ऑक्टोबर – अंतिम सामना

Leave a Comment