पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर, तरी मुक्काम तुरुंगातच


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयामध्ये आज (मंगळवारी) आयएनएक्स मीडिया कथित गैरव्यवहारप्रकरणी सुनावणी झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे चिदंबरम यांना दिलासा मिळाला आहे. त्यांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला होता, पण ते २४ ऑक्टोबर पर्यंत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत असणार आहेत.

पी. चिदंबरम यांची 21 ऑक्टोबरला अटक केल्यापासून फक्त एकदाच ईडीने चौकशी केल्याचे बोलले जात असल्यामुळे ईडी सखोल चौकशी न करता चिदंबरम यांना तुरुंगात ठेवत असल्याचेही बोलले जात होते. याबाबत न्यायालयात त्यांच्या वकिलांनीही युक्तीवाद केला होता. त्यामुळे चिदंबरम यांना जामीन मिळाल्याचे बोलले जात आहे.

पी. चिदंबरम दिल्ली न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर तिहार तुरुंगामध्ये होते. पण, सक्तवसुली संचालनालयाने त्यानंतर चिदंबरम यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने २१ ऑगस्टला आयएनएक्स गैरव्यवहारप्रकरणी अटक केली होती. सीबीआयने नुकतेच त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम आणि काही सरकारी अधिकाऱ्यांचे नावही आरोपपत्रात समाविष्ट केले आहे. ही कारवाई भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याखाली करण्यात आली.

२०१७ साली चिदंबरम यांच्यावर ‘फॉरेन इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्ड’ मध्ये गैरव्यवहार दिसून आल्याने सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. हा व्यवहार चिदंबरम तत्कालीन अर्थमंत्री असताना झाला होता. आयएनएक्स मीडियाला नियमांना डावलून भांडवल जमा करण्यासाठी त्यांच्या कार्यकाळात परवानगी देण्यात आली असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सक्तवसूली संचलनालयाने त्याचवर्षी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.

उच्च न्यायालयाने सप्टेंबर ३० तारखेला जामीन नाकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी धाव घेतली होती. ए. एम. सिंघवी आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल त्यांची बाजू न्यायालात मांडली. पुराव्यामध्ये फेरफार करण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांना जामीन द्यावा, असे चिदंबरम यांचे वकील सुनावणीच्या वेळी म्हणाले होते. सीबीआयची बाजू न्यायालयामध्ये महाधिवक्ता तुषार मेहता यांनी मांडली होती. चिदंबरम चौकशीदरम्यान देश सोडून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना जामीन नाकारावा असा युक्तिवाद मेहता यांनी याआधी केला होता.

Leave a Comment