डुलकी काढणाऱ्या शास्त्रीबुवांना नेटकऱ्यांनी घेतले फैलावर

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या तिसऱ्या कसोटीत 1 डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने 3-0 ने मालिका आपल्या नावावर केली. याआधीच्या दोन्ही कसोटी सामन्यात देखील भारतीय संघाचा विजय झाला होता.

याच पार्श्वभूमीवर सामन्यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो भारताचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांचा असून, फोटोमध्ये दिसत आहे की, ते सामन्या दरम्यान झोपले आहेत. त्यांचा झोपेत असतानाचा हा फोटो कॅमेऱ्यात कैद झाला.

सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी यावर मिम्स शेअर करण्यास सुरू केले.

युजर्स त्यांची ही झोप 10 कोटी रूपयांची असल्याचे सांगत आहे. कारण रवि शास्त्री यांचे वार्षिक वेतन 10 कोटी रूपये आहे. एका युजर्सने तर झोपण्यासाठी 10 कोटी मिळत आहे, शास्त्री खरेच नशीबवान आहेत, असे देखील म्हटले.

 

Leave a Comment