या अटीनुसार असेल तुमचा चेहरा तर मिळतील 92 लाख रुपये!


लंडन : सध्या रोबोसाठी एक असा चेहरा टेक कंपनी जिओमिक शोधत आहे, जो’माणसा’सारखा असेल. कंपनीने यासाठी संबंधित व्यक्तीला 92 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. आपल्या नव्या रोबोसाठी हव्या असणाऱ्या चेहऱ्याबाबत कंपनीने काही अटी ठेवल्या आहेत. दयाळूपणा आणि मैत्रीपूर्ण भाव चेहऱ्यावर दिसले पाहिजे असे कंपनीने म्हटले आहे. त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा यासाठी करार केला जाईल आणि रक्कम दिली जाईल. रोबोला हुबेहुब माणसासारखा चेहरा देण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे.

याबाबत जिओमिक कंपनीने सांगितले की, व्हर्च्युअल फ्रेंड असे रोबोचे नाव ठेवण्याचा विचार सुरू आहे. हा रोबो पुढच्या वर्षीपर्यंत तयार होईल. दरम्यान त्याच्या चेहऱ्यासाठी शोध सुरू केला आहे. यासाठी कंपनीने अनेक चेहऱ्यांची चाचणी केली आहे. निव़ड करण्यात आलेल्यांना त्याचा मोबदला दिला आहे.

मानवी चेहऱ्याची रोबोसाठी मागणी करणे हे जरा विचित्र वाटत असेल. पण अशा चेहऱ्यांचा शोध कंपनी घेत आहे जे वेगळे दिसत असतील. करार केल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला त्याच्या चेहऱ्याला एका रोबोटसाठी तयार केले जाईल. त्यानंतर रोबो माणसासारखा दिसेल. त्याची वेगळी ओळख असेल.

आपल्या या प्रोजेक्टवर रोबोटिक्स कंपनी असलेल्या जिओमिक गेल्या 5 वर्षांपासून काम करत आहे. अत्यंत गोपनीय असा हा प्लॅन असून कोणतीही माहिती याच्याशी संबंधित कंपनीने बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली होती. आता कंपनी रोबोच्या चेहऱ्यासाठी शोध घेत आहे. ज्या चेहऱ्यांची निवड केली जाईल त्यांची माहिती रोबोमध्ये देण्यात येईल.

Leave a Comment