दोनपेक्षा जास्त मुले असलेल्यांना मिळणार नाही सरकारी नोकरी


गुवाहाटी – सोमवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय आसामच्या मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयानुसार, दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना एक जानेवारी 2021 पासून कोणतीही सरकारी नोकरी दिली जाणार नाही. हा निर्णय सोमवारी सायंकाळी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत झाला.

नव्या भूमी कायद्यालाही मंत्रिमंडळाच्या या बैठकीत मंजुरी देण्यात आली. भूमिहीन लोकांना यामुळे तीन गुंठे शेतजमीन आणि एक घर बांधण्यासाठी अर्धा गुंठा जमीन मिळेल. मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी याबाबत जनसंपर्क कार्यालयाद्वारे एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये छोट्या कुटुंबाच्या मानकानुसार, दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना एक जानेवारी 2021 पासून सरकारी नोकरी मिळणार नाही.

नुकत्याच संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रकरणांच्या विभागाच्या ‘पॉप्युलेशन डिव्हिजन’ने ‘द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोस्पेक्ट 2019 हायलाईट्स (विश्व जनसंख्या संभावना) मध्ये मुख्य मुद्दा मांडला होता. 2027 च्या आसपास भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश बनेल, असे त्यांनी म्हटले आहे. 2050 पर्यंत भारताच्या लोकसंख्येत 27.3 कोटींची वाढ होऊ शकते. यासोबतच या शतकाच्या शेवटी भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल.

Leave a Comment