या महिला खासदाराने परिक्षा देण्यासाठी ठेवल्या 8 डुप्लिकेट

बांग्लादेशच्या महिला खासदार तमन्ना नुसरत यांच्यावर परिक्षेमध्ये लबाडी करण्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी युनिवर्सिटीमधील 13 परिक्षेंमध्ये आपल्या सारख्याच दिसणाऱ्या 8 व्यक्तींचा वापर केला आहे. एका स्थानिक टिव्ही चॅनेलने तमन्ना नुसरत यांच्या जागी परिक्षा हॉलमध्ये बसलेल्या महिलेशी संवाद साधला. युनिवर्सिटीने या प्रकरणावर त्वरित कारवाई करत तमन्ना यांना काढून टाकले.

नुसरत बांग्लादेशच्या ओपन युनिवर्सिटीमधून बीएची पदवी घेत आहे. याशिवाय त्या काही प्रोफेशनल कोर्स देखील करत आहेत. बांग्लादेशमधील नागोरिक टिव्ही चॅनेलला समजले की, तमन्ना यांनी आपल्या जागी परिक्षेत त्यांच्या सारख्या दिसणाऱ्या 8 जणांना ठेवले आहे. त्यानंतर चॅनेलची टीम ज्या ठिकाणी परिक्षा चालू होती त्या हॉलमध्ये पोहचली. त्यानंतर परिक्षेला बसलेल्या महिलेला चॅनेलने प्रश्न विचारले, त्यावेळी सत्य समोर आले. तमन्ना या सत्तेत असलेल्या अवामी लीग पार्टीच्या खासदार आहे. त्या पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत.

रिपोर्टनुसार, युनिवर्सिटीतील अनेक अधिकाऱ्यांना माहिती होते की, परिक्षेमध्ये तमन्ना नसून त्यांच्या सारखी दिसणारी व्यक्ती आहे. तमन्ना यांनी 13 परिक्षा दिल्या असून, यासाठी 8 मुलींचा वापर करण्यात आला. याशिवाय पक्षाने देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.

 

Leave a Comment