अमेरिकेची टेक कंपनी अॅपलने आयफोन एक्सआरची मॅन्युफॅक्चरिंग भारतात सुरू केली आहे. पहिल्यांदा असे झाले आहे की, कंपनीने आपला महागडा आयफोन बनवण्याचे काम भारतातील वेंडर प्लांटला दिले आहे. आता आयफोन एक्सआरचे सर्व युनिट्स चेन्नई येथील फॉक्सकॉनच्या फॅक्टरीमध्ये बनतील.
आता आयफोनवर दिसणार ‘मेड इन इंडिया’ टॅग
कंपनीने आयफोन एक्सआर वर मोठ्या प्रमाणात ऑफर्स दिल्या होत्या. या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देखील भारतीय बाजारात स्मार्टफोन सेंगमेंटमध्ये अॅपल टॉपवर आहे.
या मॅन्युफॅक्चरिंगनंतर अॅपल भारतीय बाजाराकडे लक्ष केंद्रित करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. फॉक्सकॉनचे चेअरमन टेरी गोऊ यांनी देखील आयफोनचे मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन भारतात करणार असल्याचे सांगितले होते.
सध्या आयफोन एक्सआरची भारतात ऑनलाईन किंमत 44,900 रूपये आहे. भारतातील आयफोनची विक्री देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.