कोण आहे हार्दिक पंड्याची व्हेलेंटाईन नताशा?


टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या सध्या लंडन मध्ये त्याच्यावर झालेल्या पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर आराम करत असला तरी त्याची व्हेलेंटाइन म्हणजे गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविक आणि हार्दिक यांच्याविषयीच्या चर्चा सोशल मिडियावर जोरात सुरु आहेत. हार्दिकने नताशाची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून दिली आहे आणि कुटुंबियांना नताशा आवडली असल्याच्या बातम्या पूर्वीच आल्या आहेत. हार्दिक आणि नताशा लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.


स्पॉटबॉयच्या माहितीनुसार २७ वर्षीय नताशा मूळची सर्बियाची नागरिक असून ती सध्या मुंबईत राहते. बॉलीवूड अभिनेत्री आणि डान्सर अशी तिची ओळख असून तिने करियरची सुरवात मुंबईत मॉडेल म्हणून केली आहे. अनेक नामवंत ब्रांडच्या जाहिराती तिने केल्या आहेत. बॉलीवूड मध्ये तिला २०१३ मध्ये प्रकाश झा यांच्या सत्याग्रह सिनेमात पहिली संधी मिळाली. त्यात तिने अजय देवगण बरोबर नृत्य केले होते. २०१४ मध्ये बिग बॉसच्या आठव्या सिझनमध्ये ती १ महिना बिग बॉसच्या घरात राहिली होती. तिथेच तिला खरी प्रसिद्धी मिळाली.

सिंगर बादशहा म्युझिक व्हिडीओ मध्ये तिने डीजेवाले बाबूवर केलेल्या नृत्यामुळे ती चांगलीच चर्चेत अली. फुकरे रिटर्नमध्येही मेहबुबा गाण्यावर तिने नृत्य केले होते. शाहरुखच्या झिरो मध्ये तिने कॅमियो रोल केला होता. सध्या ती नच बलिये मध्ये सामील झालेली आहे.

Leave a Comment