
बॉलीवूड मधली ड्रीमगर्ल आणि आता मथुरेची भाजप खासदार हेमामालिनी एमजी हेक्टर फॅमिलीची नवी सदस्य बनली आहे. हेमाने नुकतीच एमजी हेक्टर एसयूवी खरेदी केली असून तिच्या ७१ व्या वाढदिवशी म्हणजे १६ ऑक्टोबर रोजी तिला नव्या कारची डिलीव्हरी दिली गेल्याचे मुंबईतील डीलरने सांगितले. त्याने या संदर्भातला एक व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे हेमामालिनीने कुठल्यातरी विमानतळावर डिस्प्ले केलेली एमजी हेक्टर कार पहिली होती आणि तेव्हाच ती या कारच्या प्रेमात पडली होती असेही समजते.
ड्रीमगर्ल हेमामालिनीने खरेदी केली एमजी हेक्टर
हेमा या कारविषयी व्हिडीओमध्ये बोलली आहे. तिच्या मते या एसयूव्हीची उंची थोडी कमी असल्याने गाडीत बसणे, उतरणे सहज होते. कारच्या अन्य सुविधा उत्तम आहेत. हेमाने टॉप मॉडेल डिझेल शार्प व्हेरीयंट खरेदी केले आहे. त्यात पॅनोरमिक सनरुफ, ३६० डिग्री कॅमेरा, अँबीयंट लायटिंग, लेदर अपहोल्स्ट्री, पुशबटन स्टार्ट, अॅपल कारप्ले आहे. तसेच ऑटो फिचर मध्ये रिमोट कंट्रोल आधारित अॅप आहे. यामुळे स्मार्टफोन वरून कारचे तापमान, प्री कुल कंट्रोल करता येते. ही एसयूवी गुजराथच्या हलोल प्लांट मध्ये उत्पादित केली जात आहे.
