नवीन लूकमध्ये येत आहे होडांची लोकप्रिय बाईक सीबी शाईन

होडांची सीबी शाईन ही बाईक 125 सीसी सेगमेंटमध्ये सर्वाधिक लोकप्रिय बाईक आहे. आता कंपनी ही बाईक बीएस6 इंजिनसोबत नव्या लूकमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे.

होंडा सीबी शाईन 125 एसपीमध्ये नवीन अपडेटेड  124.73cc, एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन मिळेल, जे  S6 एमिशन नॉर्म्सनुसार असेल. हे इंजिन 10.88hp पॉवर देईल. याशिवाय यात फ्यूल इंजेक्शनची देखील सुविधा मिळेल. बाईकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स असतील.

(Source)

लीक झालेल्या माहितीनुसार, बीएस 6 मॉडेल हे सध्या बाजारात असलेल्या मॉडेलपेक्षा मोठे असेल. या बाईकची लांबी 13mm ने वाढून  2,020mm झाली आहे, तर रूंदी 785mm आहे. नवीन सीबी शाईनची उंची 1,103mm आणि व्हीलबेस 19mm ने वाढून 1,285mm करण्यात आली आहे.

 

(Source)

 

BS6 होंडा CB Shine 125 SP लवकरच बाजारात दाखल होणार आहे. किंमतीबद्दल सांगायचे तर सध्या बाजारात असलेल्या मॉडेलच्या तुलनेत या बाईकची किंमत अधिक असेल.

Leave a Comment