१४ वर्षांच्या नात्याला ‘क्ले कोर्ट’च्या बादशाहाने दिले नवे नाव


आपल्या दमदार खेळाने टेनिसच्या विश्वात चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा आणि क्ले कोर्टचा बादशाह अशी ज्याची ओळख आहे अशा राफेल नदाल याच्या जीवनात एक नवे वळण आले आहे. राफेल नदाल जवळपास १४ वर्षांपासूनची पार्टनर, प्रेयसी सिस्का पेरेलो हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला आहे.

त्यांनी स्पेनमधील Mallorca येथील एका कॅसलमध्ये आयुष्यभरासाठी एकमेकांना साथ देण्याची वचने दिली. मोजक्याच मंडळींची उपस्थिती या अत्यंत खासगी स्परुपात पार पडलेल्या विवाहसोहळ्याला पाहायला मिळाली होती. 1975 ते 2014 दरम्यान, स्पेनचा राजा असणाऱ्या ज्युआन कार्लोस यांची नदालच्या या विवाहसोहळ्याला विशेष उपस्थिती होती. या खास आणि तितक्याच दिमाखदार विवाहसोहळ्यासाठी मिशेलीन स्टार शेफ क्वेक डा`कोस्टा यांनी मेजवानीची जबाबदारी सांभाळली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

आगामी स्पर्धेच्या तयारीत नदालचा प्रतिस्पर्धी आणि तितकाच चांगला मित्र, विश्वविख्यात टेनिसपटू रॉजर फेडरर असल्यामुळे या विवाहसोहळ्यात त्याची अनुपस्थिती पाहायला मिळाली. जवळपास ३५० पाहुण्यांच्या उपस्थितीत राफेल आणि सिस्का विवाहबंधनात अडकले. यावेळी टेनिसपटू फॅलिन्सिएनो लोपेज, डेव्हिड फेरर, ज्युआन मोनाको यांनी हजेरी लावली होती.

टेनिस जगतात दमदार फॉर्ममध्ये असणाऱ्या नदालची पत्नी, ३१ वर्षीय सिस्का हीने बिझनेस क्षेत्रातील पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. तिने इन्शुरन्समधील नोकरी सोडत राफेल नदाल फाऊंडेशनमध्ये संचालकपदाचा पदभार सांभाळला. नदाल आणि सिस्का यांची भेट ही त्याच्या लहान बहिण मॅरिबेलमुळे झाली होती. नदालही बहीण आणि सिस्का या दोघीही बालपणीच्या मैत्रीणी असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment