लेडी गागाचे संस्कृत श्लोकामुळे भारतीय नेटकऱ्यांकडून कौतूक

हॉलिवूडची प्रसिध्द गायिका लेडी गागाचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. मात्र आता तिच्या भारतीय चाहत्यांमध्ये अचानक वाढ झाली आहे. याला कारण ही तसेच आहे. लेडी गागाने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक संस्कृत श्लोक ट्विट केला आहे. लेडी गागाच्या या ट्विटवर भारतीय युजर्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

लेडी गागाने ट्विट केले की, ‘लोक: समस्त: सुखिनो भवन्तु:’. या संस्कृत श्लोकाचा अर्थ होतो की, या जगात सर्वजण सर्व ठिकाणी आनंदात राहो. लेडी गागाच्या या ट्विटने तिचे परदेशी चाहते गुगलवर याचा अर्थ शोधू लागले तर भारतीय चाहते भलतेच खूश झाले.

या ट्विटला आतापर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक लाईक्स आले आहेत तर शेकडो भारतीय युजर्स या श्लोकाचा अर्थ सांगत आहेत.

Leave a Comment