बायकोकडून ‘या’ गोष्टीचे धडे घेत आहे रणवीर


बॉलिवूडमध्ये अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण ही जोडी लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. एकमेकांप्रती असलेले प्रेम दोघेही खुलेपणाने व्यक्त करत असतात. दोघांची सोशल मीडियावरही चांगलीच क्रेझ आहे. एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघेही विवाहबद्ध झाले. नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होईल. तरीही त्यांच्या नात्यात नेहमी चैतन्य पाहायला मिळते. दीपिकाकडुन संसारात नेमके काय शिकायला मिळते, याचा खुलासा रणवीरने केला आहे.

माझा आजकाल सर्वात जास्त व्यस्त करिअर असणाऱ्यांमध्ये समावेश होतो. शानशौकीने राहायला आपल्या सर्वांना आवडते. आपण त्यासाठी बरीच मेहनत घेत असतो. जे काही मी करतो, ते मनापासून करतो. माझा जॉब मला आवडतो. पण, मी संसार आणि करिअर यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करतो. मला वेळेचे नियोजन जेव्हाही करायचे असते, तेव्हा याचे सल्ले मी माझी सर्वात सुंदर पत्नी दीपिकाकडून घेत असतो. वेळेचे नियोजन करण्यात दीपिका अगदी तरबेज आहे. तिच्याकडुन मी देखील हे शिकत असल्याचे रणवीर म्हणाला. त्याची फ्रँक मुलर या घड्याळाच्या ब्रँड अँम्बॅसडरपदी अलिकडेच निवड झाली आहे. त्याने हा खुलासा माध्यमांशी मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना केला.

तुझ्यासाठी आयुष्यात चैन असणे म्हणजे काय, असा प्रश्न यावेळी त्याला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला, माझ्यासाठी एक दिवसाची सुट्टी ही चैन आहे. माझ्या पत्नीसोबत वेळ घालवायला जरी मला मिळाला तरी ती माझ्यासाठी एकप्रकारची चैनच असल्याचे तो म्हणाला.

Leave a Comment