या आकड्याच्या पुढे जाता येणार नाही महायुतीला – मनोहर जोशी


मुंबई – राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी घरचा आहेर दिला आहे. २२० ते २३० पर्यंत जागा शिवसेना आणि भाजपला मिळणार नाहीत. २०० च्या पुढे त्यांना जाता येणार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. एकीकडे राज्यात २२० ते २३० जागा मिळतील असा दावा शिवसेना भाजप करत असतानाच मनोहर जोशींचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

पक्ष नेतृत्वाविरोधात मी जात नाही. त्याचबरोबर शिस्त पाळणारा मी शिवसैनिक आहे. कोणता नेता कोणता दावा करतो यावर हे अनेक गोष्टींवर अवलंबून असल्याचेही जोशी यावेळी म्हणाले. तसेच मुख्यमंत्री शिवसेनेचाच विराजमान होईल असा दावाही त्यांनी यावेळी केला. यावेळी शरद पवार आणि त्यांच्या संबंधांवरही त्यांनी भाष्य केले. शरद पवार आणि माझे संबंध चांगले आहेत. असे असले तरी ते करत असलेल्या सर्वच गोष्टी योग्य नाहीत. एक दिवस आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होतील आणि शिवसेनेतही ते महत्त्वाची भूमिका पार पाडतील, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Comment