या ठिकाणी सापडला तब्बल 8 हजार वर्ष जुना मोती

अबु धाबी येथे 8 हजार वर्ष जुना मोती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, हा जगातील सर्वात जुना मोती आहे. यावरून स्पष्ट होते की, नियोलेथिक काळांपासून वस्तूंचा व्यवसाय केला जात आहे.

हा मोती संयुक्त अरब अमिरातीतील मारवाह द्वीपवर खोदकाम करत असताना एका खोलीतील फरशीवर सापडला होता. अबू-धाबीच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाने म्हटले होते की, ज्या ठिकाणी हा मोती सापडला आहे, ते 5800-5600 इ.स.पुर्व नियोलेथिक काळात बनवण्यात आले आहे.

अबु धाबी संस्कृती आणि पर्यटन विभागाचे चेअरमन मोहम्मद अल-मुबारक यांनी म्हटले की, अबु धाबीमधील जगातील सर्वात जुना मोती सापडणे हेच दर्शवते की, आमचा इतिहास आणि संस्कृती खूप जुनी आहे. मारवाह येथे खोदकाम करताना मातीची भांडी, चमकणारे तीर, मोती सापडले आहेत.

हा मोती ‘10000 वर्षांची लग्झरी’ या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. हे प्रदर्शन 30 ऑक्टोंबरपासून अबु धाबीमधील प्रसिध्द पॅरिस म्युझियम येथे सुरू होणार आहे.

संस्कृती विभागाने म्हटले आहे की, अबू धाबीचा प्रवास करणाऱ्या वेनिसचा आभूषण व्यापारी गॅस्पारो बलबीने 16 व्या शतकात अबु धाबीतील ठिकाण ही मोती सापडण्याचे ठिकाण असल्याचे म्हटले होते.

 

Leave a Comment