बदलल्या बँकांच्या कामाकाजांच्या वेळा


नवी दिल्ली – देशभरातील विविध बँकांच्या कामकाजाच्या ठरलेल्या वेळांनुसार बँकेची कामे करण्यासाठी नागरिकांना वेळ देऊ केला जातो. पण कामकाजाच्या वेळा काहींमध्ये बँकांच्या वेगळ्या असल्याने संभ्रम निर्माण होतो. त्यासाठी आता इंडियन बँक्स असोसिएशनच्या माध्यमातून तोडगा काढण्यात आला असून दिलेल्या वेळेत देशभरातील बँका सुरु राहणार आहेत. बँक शाखांच्या वर्गवारीनुसार त्यांचे कामकाज तीन वेळेत विभागले जाणार आहे.

आता नव्या वेळापत्रकानुसार देशभरातील बँका सकाळी 9 ते 3, 10 ते 4 आणि 11 ते 5 या वेळेनुसार बँकेचे कामकाज सुरु राहणार आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून देशातील विविध बँकांसाठी हे नवे वेळापत्रक लागू करण्यात येणार असल्यामुळे सकाळी 9 ते 4 वेळेत स्थानिक क्षेत्रामधील बँका सुरु राहिल. तसेच नागरिकांना 9 ते 3 वाजल्याच्या दरम्यान बँकेचे व्यवहार करता येणार आहेत. व्यापारी विभागीतील बँकांचे कामकाज सकाळी 11 ते 6 मध्ये होणार आहे. पण खातेधारकांना 11 ते 5 मध्ये बँकेचे काम करता येणार आहे. त्याचसोबत अन्य परिसरातील बँक शाखा 10 ते 5 या वेळेत सुरु राहणार आहे. तर ग्राहकांना 10 ते 4 दरम्यान कामे पूर्ण करता येणार आहेत.

हा निर्णय इंडियन बँक्स असोसिएशनच्या एका बैठकीत घेण्यात आला आहे. बँकेच्या तीन विभागात कामकाज होणार असल्याचा प्रस्ताव त्यामध्येच मांडण्यात आला होता. बँक ऑफ महाराष्ट्रकडे एसएलबीसीचे अध्यक्षपद आहे. त्यानुसार हे नव बँकेच्या कामकाजाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तर www.bankofmaharashtra.in वर याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment