बिल गेट्स यांनी केले अभिजीत बॅनर्जींचे कौतूक


नवी दिल्ली – भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी यांचे कौतुक करत बॅनर्जी यांना अर्थशास्त्रासाठी मिळालेल्या नोबल पारितोषिकाबद्दल मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. बॅनर्जी, त्यांची पत्नी इस्थर डफ्लो आणि मायकेल क्रीमर यांना काही दिवसांपूर्वीच संयुक्तपणे या वर्षीचा अर्थशास्त्राचा नोबल जाहीर झाला होता.

ट्विटरवर सर्व विजेत्यांचे अभिनंदन करतानाच त्यांच्या कामातून आपल्याला जगातील सर्व गरीब लोकांच्या आयुष्यात असणाऱ्या गुंतागुंतीबद्दल बरंच काही शिकायला मिळाले असल्याचेही गेट्स यांनी सांगितले. बॅनर्जी, डफ्लो आणि क्रीमर यांना गरिबी उत्थापनाच्या प्रायोगिक दृष्टीकोनासाठी पारितोषिक मिळाले होते.

जागतिक गरिबीशी लढा देण्याच्या आपल्या क्षमतेत यावर्षीच्या लॉरिएटसने केलेल्या संशोधनामुळे वाढ सुधारणा झाली आहे. फक्त दोन दशकांतच त्यांच्या प्रयोगावर आधारित पद्धतीमुळे ‘विकासाचे अर्थशास्त्र’ बदलले आहे, ज्यात आता संशोधनाच्या भरभराटीला वाव असल्याचे विधान नोबल कमिटीने केले.

आपल्या संशोधनामध्ये बॅनर्जी यांनी सरकारी योजना किती क्रियाशीलतेने पार पाडल्या जातात याचा अभ्यास केला आहे. राजस्थान मधील एका भागात पोलिओ उच्चाटनासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेचा अभ्यास करताना असे लक्षात आले की आपल्या मुलांना लसीकरणासाठी कित्येक माता केंद्रांवर घेऊन जात नाहीत. परंतु तेच जेव्हा त्यांच्या कडे सर्व लसींची एक थैली घरपोच देण्यात आली तेव्हा त्या भागातील लसीकरणाचा दर कमालीने वाढला. तसेच मुलांच्या शैक्षणिक विकासाबाबत अभ्यास करताना त्यांनी मुलांच्या विकासाचा शाळांच्या स्थितींशी सॅम प्रमाणात संबंध असल्याचेही प्रतिपादन केले होते.

Leave a Comment