जान्हवीने नव्या कारशी जोडली आई श्रीदेवीची स्मृती


श्रीदेवी कन्या जान्हवी बॉलीवूड मध्ये चांगलीच स्थिरावली असून तिचे आगामी चित्रपट, जिमचे शेड्यूल. फोटो शूट, जाहिराती, फॅशन शो याची सतत चर्चा सोशल मिडियावर होत असते. जान्हवी आई श्रीदेवीच्या खूप जवळ होती आणि आईची आठवण तिला सतत होत असते हे तिच्या अनेक कृतीतून दिसून येते. कधी श्रीदेवीसारखी साडी तिच्या अंगावर दिसते तर कधी आणखी काही.

जान्हवीने नुकतीच नवी मर्सिडीज मेबॅच ही कार विकत घेतली असून अनेकदा ती याच कारमधून जाताना दिसते. या नव्या कारशी तिने श्रीदेवीची आठवण गुंफली असल्याचे सांगितले जाते. श्रीदेवी ज्या कारचा वापर बहुतेक वेळा करायची त्या कारचा नंबर होता ७६६६. जान्हवीने तिच्या नव्या कारसाठी हाच ७६६६ नंबर घेतला आहे.

Leave a Comment