सलग 19 तास उड्डाण करत क्वांटस एअरलाइनने रचला विक्रम

अमेरिकेतील न्युयॉर्कमधून प्रवांशांना घेऊन उड्डाण घेतलेले विमान 19 तास 16 मिनिटांचे नॉनस्टॉप प्रवास करत ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे उतरले आहे. क्वांटस क्यूएफ 7879 ने यावर्षीच्या सुरूवातीला सर्वाधिक लांब उड्डाण घेण्याची योजना बनवली होती. याच योजनेंतर्गत विमानाने न्युयॉर्क ते सिडनी असा सर्वात दीर्घ प्रवास केला आहे.

या विमानात एकूण 49 लोक होती. क्वांटसचे मुख्य अधिकारी एलन जोएसेने वैमानिक क्षेत्रात हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे.

तीन वर्षांपासून या उड्डाणाच्या योजनेवर काम सुरू होते. विमानाने 16 हजार किमीचा हा प्रवास न थांबता व पुन्हा इंधन न भरता पुर्ण केला आहे. या शिवाय क्वांटस एअरलाइनने ऑस्ट्रेलियातील दोन युनिवर्सिटींबरोबर देखील भागिदारी केली आहे. या युनिवर्सिटी वेगवेगळ्या टाइमझोनमधून जाताना प्रवाशांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करतील.

मागील वर्षी देखील क्वांट्सने पर्थ ते लंडन असा नॉनस्टॉप 17 तासांचा प्रवास करत विक्रम केला होता.

 

Leave a Comment