गुगलने अमेरिकेत दिली पहिली ड्रोन डिलीव्हरी


अल्फाबेट गुगलच्या सब्सिडरी, विंगने ड्रोनच्या माध्यमातून अमेरिकेत पहिली पॅकेज डिलीव्हरी दिली आहे. विंगने क्रिश्चियनबर्ग मध्ये छोट्याश्या व्हर्जिनिया शहरात ही डिलीव्हरी दिल्याचे जाहीर केले गेले आहे. दोन ऑस्ट्रेलियन शहरे आणि हेलसिंकी येथे काम करणारी विंग ही पहिली ड्रोन संचालित डिलीव्हरी देणारी कंपनी आता क्रिश्चियनबर्ग मध्ये शुक्रवारी पहिली डिलीव्हरी देऊन अमेरिकेत ड्रोन सेवेची सुरवात करणारी कंपनी बनली आहे. शुक्रवारी दुपारी ही सेवा सुरु झाली असून एका परिवाराला औषधे तर दुसऱ्या एका परिवारात पत्नीसाठी नवऱ्याने मागविलेले बर्थडे गिफ्ट ड्रोनच्या सहाय्याने पोहोचविले गेले असे समजते.

यात ड्रोनमध्ये ग्राहकाचा पत्ता जीपीएसने फीड केला गेला आणि पार्सल दोरीच्या सहाय्याने ड्रोनला बांधले गेले. ड्रोन ग्राहकांच्या घराच्या बागेत पोहोचल्यावर वरून पार्सल ड्रॉप करून परत फिरले. पिवळ्या पांढऱ्या रंगाच्या या डिलीव्हरी ड्रोनचे नामकरण नेस्ट असे केले गेले आहे. या डिलीव्हरीतून १.३ किलोचे सामान १० किमी परिसरात पाठविणे शक्य आहे. अमेझोन, उबर ईट व युपीएस अशीच सेवा लाँच करण्याचा तयारीत आहेत मात्र ड्रोन डिलीव्हरीसाठी काही नियम केले गेले आहेत. त्यानुसार रस्ते, गर्दीच्या भागावरून ड्रोन उडविता येणार नाहीत तसेच सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ आणि रविवारी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळातच ड्रोन डिलीव्हरी देऊ शकणार आहेत.

Leave a Comment