भारतात जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक इंटरनेट युजर्स आहेत. भारतात इंटरनेट स्बस्क्राईबर्सची संख्या 63 कोटींपेक्षा अधिक आहे. विचार करा जर सरकारने सोशल मीडिया वापरासाठी कर लावला तर काय होईल ?
व्हॉट्सअॅपवर लावला कर तर नागरिकांनी केले हिंसक प्रदर्शन
भारतात अद्याप तरी सोशल मीडिया वापरण्यासाठी कर लादण्यात आलेला नाही. मात्र लेबनानमध्ये सरकारने व्हॉट्सअॅप आणि फेसबुक कॉलिंग सेवेवर कर लावला आहे. सोशल मीडियावर कर लावल्याने लेबनानची राजधानी बेरूतमध्ये नागरिकांनी हिंसक प्रदर्शन केले.
लोकांनी गांड्यावर हल्ले केले. टायर जाळले. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, 40 सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. याचबरोबर विमानतळावर देखील निदर्शन करणाऱ्यांनी प्रवाशांना मारहाण केली.
लेबनान सरकारची अर्थव्यवस्था ठासळली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना बजेटसाठी कर्ज घ्यावे लागत आहे. कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने व्हॉट्सअॅप आणि फेसबुक कॉलिंगवर महिन्याला 150 रूपये कर लावला आहे. सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी नागरिकांनी निदर्शने केली. नागरिकांनी केलेल्या हिंसक प्रदर्शनानंतर सरकारने कराचा निर्णय मागे घेतला आहे.
युंगाडामध्ये आधीपासूनच सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी कर द्यावा लागत आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, वाइबर आणि ट्विटर सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी प्रतिदिन 3 रूपये 36 पैसे द्यावे लागत आहेत.
