एमजी हेक्टरच्या यशानंतर कंपनी लाँच करणार नवीन एसयूव्ही

हेक्टरच्या यशानंतर एमजी मोटर कंपनी आता आपली नविन इलेक्ट्रिकल कार eZS ला भारतात लाँच करण्यासाठी तयार आहे. नविन eZS ही एक क्रॉसओव्हर आहे. काही दिवसांपुर्वीच कंपनीने याचा एक टीझर लाँच केला होता.

ही इलेक्ट्रिकल कार याचवर्षी डिसेंबरमध्ये भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. किंमतीबद्दल अधिकृत माहिती समोर आली नसली तरी नविन eZS ची किंमत 15 ते 20 लाख रूपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

(Source)

नवीन eZS इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये  110kW क्षमता असलेल्या इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला आहे. जे 143 पीएस पॉवर आणि 353 एनएम टॉर्क देते. फुल चार्ज केल्यावर ही एसयूव्ही 262 किमीपर्यंत जाऊ शकते. याशिवाय केवळ 3.1 सेंकदात ही कार ताशी 100 किमीचा वेग पकडू शकते. मात्र सांगण्यात येत आहे की, कंपनी यामध्ये 52.5 kWh ची लिथियम इऑन बॅटरीचा वापर करेल.

(Source)

या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये फ्रंट एक्स्ले माउंडेट इलेक्ट्रिक मोटर लावण्यात आलेली आहे. यामध्ये लेटेस्ट रेस्पॉन्सिव 8 इंच कलर टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम लावण्यात आलेला आहे. ज्यामध्ये सेटेलाईट नेविगेशन, अँड्रॉयड ऑटो, अॅपल कारप्ले, ब्लूटूथ ऑडियो स्ट्रीमिंग आणि डीएबी रेडिओसारखे फीचर्स मिळतील. नवीन हेक्टर eZS इलेक्ट्रिक एसयूव्ही ह्युंडाईच्या कोनाला टक्कर देईल.

Leave a Comment