रेल्वे उशीरा आल्याने प्रवाशांना पहिल्यांदाच मिळणार रिफंड

कानपूर सेंट्रल स्टेशनवर पोहचण्यास खाजगी रेल्वे तेजस एक्सप्रेसला पोहचण्यास पावणे तीन तास उशीर झाला. लखनऊ यार्डमधील डिरेलमेंटमुळे तेजस एक्सप्रेसला निघण्यास उशीर झाला. एक्सप्रेसला पोहचण्यास उशीर झाल्याने अखेर नवी दिल्ली ते कानपूर जाणाऱ्या 516 प्रवाशांना 250 रूपये रिफंड करण्यासाठी लिंक पाठवण्यात आली आहे.

या लिंकचा वापर करून प्रवाशी रिफंडसाठी अर्ज करू शकतात. एक्सप्रेसला उशीर झाल्याने आयआरसीटीसीने दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी लंच आणि डिनरच्या डब्ब्यांवर सॉरीचे स्टिकर देखील लावून दिले. तेजस एक्सप्रेस सकाळी 7.20 च्या ऐवजी सकाळी 10.03 वाजता कानपूर सेंट्रल स्टेशनवर पोहचली. रेल्वेला उशीर झाल्याने प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला.

आयआरसीटीसीनुसार, जर तेजस एक्सप्रेसला 1 तास उशीर झाला तर 100 रूपये रिफंड देण्यात येईल व दोन तासांपेक्षा अधिक उशीर झाल्यास 250 रूपये रिफंड दिले जाईल.या आधारावर बुक करण्यात आलेल्या मोबाईल नंबरवर रिफंडसाठी लिंक पाठवण्यात आली आहे. रेल्वेला उशीर झाल्यामुळे प्रवाशांना रिफंड मिळण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.

Leave a Comment