एका वर्षात रोनाल्डोने इंस्टाग्रामद्वारे केली एवढ्या कोटींची कमाई

आपल्या कोट्यावधी चाहत्यांच्या जोरावर फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोने फुटबॉलपेक्षा अधिक कमाई इंस्टाग्राम पोस्टद्वारे केली आहे. हॉपर एचक्यू ऑन बज बिंगोच्या रिपोर्टनुसार, 34 वर्षीय रोनाल्डोने एका वर्षात सोशल मीडिया साइट इंस्टाग्राम स्पॉन्सर्ड पोस्टद्वारे जवळपास 380 कोटी रूपयांची कमाई केली आहे. त्याने एका वर्षात 49 स्पॉन्सर्ड पोस्ट केल्या आहेत. एका पोस्टसाठी त्याने 6.9 कोटी रूपये घेतले.

रोनाल्डोने मागील वर्षी जुवेंट्ससोबत 242 कोटी रूपयांचा करार केला होता. रोनाल्डोने इंस्टाग्रामद्वारे होणाऱ्या कमाईच्या बाबतीत काईली जेनर, सेलेनो गोमेझ, प्रियंका चोप्राला मागे टाकले आहे.

सोशल मीडियाद्वारे कमाई करणाऱ्यांच्या यादीत लियोनल मेस्सी दुसऱ्या स्थानावर आहे. बार्सिलोनाचा खेळाडू मेस्सीने 36 स्पॉन्सर्ड पोस्टद्वारे 165 कोटींची कमाई केली आहे.

इंस्टाग्रामद्वारे कमाई करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली 11 व्या क्रमांकावर आहे. त्याने एका वर्षात स्पॉन्सर्ड पोस्टद्वारे 8.3 कोटी रूपयांची कमाई केली आहे.

 

Leave a Comment