मागील 10 वर्षात या इमारतीमधील एकही कर्मचारी पडलेला नाही आजारी !

दिल्लीच्या नेहरू प्लेस येथील पहाडपूर बिझनेस सेंटर इमारतीमधील हवा बाहेरच्या तुलनेत अधिक साफ आहे. बिल्डिंगच्या एंट्री गेटवरच सहा एअर प्युरिफायर लावण्यात आलेले आहेत. लिफ्टमधून जाण्याआधी येथे सेनिटाइजरद्वारे हात साफ केले जातात. जेणेकरून हातांची घाण लिफ्टच्या बटनाला किंवा भिंतीला लागू नये. प्रदुषणानी भरलेल्या दिल्लीमध्ये ही सर्वात स्वच्छ इमारत आहे. पॉल्युशन कंट्रोल बोर्डाकडून या इमारतीला सर्वात शुध्द हवा असणारी इमारत असे प्रमाणपत्र देखील मिळालेले आहे.

तीन दशक जुन्या या इमारतीमध्ये 8 हजार झाडे आहेत. इमारतीत रिसेप्शनपासून ते गॅलेरी, केबिन, मीटिंग हॉल आणि टॉयलेटमध्ये देखील झाडे लावण्यात आलेली आहेत. या बिल्डिंगमध्ये मायक्रोसॉफ्टचे देखील ऑफिस होते. ही इमारत 55 हजार स्केअर फूटमध्ये बनली असून, ही सहा मजली आहे.

या इमारतीचे मालक कमल मित्तल यांनी सांगितले की, ताजी हवा टिकून राहण्यासाठी रोज नवीन प्रयोग केले जातात. आतापर्यंत 3 हजार प्रयोग झाले आहेत. स्वच्छ हवेसाठी करण्यात आलेल्या प्रयोगासाठी बिल्डिंगच्या नावावर 10 पेटेंट आहेत.

रोज सकाळी या इमारतीच्या हवेचा रिपोर्ट तयार असतो. इमारतीच्या आतील हवा शुध्द ठेवण्यामध्ये सर्वात महत्त्वाचे योगदान दोन ग्रीन हाउसचे आहे. आरसा आणि वॅक्यूम ट्यूबच्या मदतीने सुर्याचा उजेड झाडांपर्यंत पोहचतो.

ग्रीन हाउसमध्ये देखील हवा शुध्द ठेवण्यासाठी सिस्टम तयार करण्यात आली आहे. सुरूवातीला पाण्याचे तापमान नियंत्रित केले जाते. त्यानंतर हवेचे तापमान नियंत्रित होते.

या इमारतीमध्ये 150 कर्मचारी काम करतात. त्यांचा ऑक्सिजन लेव्हल रोज तपासला जातो. मागील 10 वर्षांमध्ये या इमारतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आजाराच्या नावाखाली सुट्टी घेतलेली नाही. कर्मचाऱ्यांच्या ज्वाइनिंग लेटरमध्ये लिहिण्यात आले आहे की, जर कोणी आजारी पडले तर त्याची पुन्हा तपासणी करण्यात येईल.

Leave a Comment